Sandeep Deshpande आणि Santosh Dhuri यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम; आजही दिलासा नाही

Sandeep Deshpande आणि Santosh Dhuri यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम; आजही दिलासा नाही

मशिदीवरील भोग्याविरोधात आंदोलन करत असताना पोलिसांकडून अटक होण्याच्या भीतीने मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी आंदोलनातून पळ काढला. पावेळी झालेल्या गोंधळावेळी एक महिला पोलीस जमिनीवर पडल्याने जखमी झाली. या प्रकरणी धुरी आणि देशपांडेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या दोघांच्या अटकेसाठी त्यांची शोधाशोध करत असतानाच या दोघांनीही सत्र न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. आज या याचिकेवर कोर्टात युक्तिवाद झाला. त्यावर गुरुवारी 19 मे रोजी निर्णय देणार असल्याच कोटनि स्पष्ट केलं आहे. त्यामुळे धुरी आणि देशपांडे यांना अटकपूर्व जामीन मिळणार की त्यांची स्वानगी कोठडीत होणार हे गुरुवारीच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, संतोष धुरी आणि संदीप देशपांडे अद्यापही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.


User: HW News Marathi

Views: 9

Uploaded: 2022-05-17

Duration: 05:57

Your Page Title