बंधारा बचावासाठी सांगलीकरांनी मानवी साखळी करत विरोध दर्शविला| Sangali| Krishna River| Sharad Pawar

बंधारा बचावासाठी सांगलीकरांनी मानवी साखळी करत विरोध दर्शविला| Sangali| Krishna River| Sharad Pawar

सांगलीच्या कृष्णा नदीवरील बंधारा हटविण्यास सांगलीकरांनी आणि पर्यावरण प्रेमींनी विरोध दर्शविला आहे. बंधारा बचावासाठी सांगलीकर एकवटले असून त्यांनी बंधाऱ्यावरच मानवी साखळी करत विरोध दर्शविला आहे. पैलवान पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले गेले. यावेळी शेकडो नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी बंधारा वाचवण्याबाबतच्या घोषणा देण्यात आल्या आहेत. सांगलीच्या कृष्णा नदीच्या पात्रात सांगलीवाडी नजीक कोल्हापूर पद्धतीचा जुना बंधारा आहे. या बंधाऱ्यामुळे सांगलीकरांचा पाणीपुरवठा सुरळीत होत आहे.


User: HW News Marathi

Views: 9

Uploaded: 2022-06-05

Duration: 02:46

Your Page Title