Nagpur : नागपुरात कोरोनाला निमंत्रण देणारी गर्दी? दोन कार्यक्रमांमध्ये तुफान गर्दी ABP Majha

Nagpur : नागपुरात कोरोनाला निमंत्रण देणारी गर्दी? दोन कार्यक्रमांमध्ये तुफान गर्दी ABP Majha

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढतायत. नागपूरही याला अपवाद नाही. काल राज्यात 3  हजार 883 कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर नागपुरातही 56 कोरोना रुग्ण आढळले.. अशी चिंताजनक स्थिती असताना नागपुरात आयोजित दोन कार्यक्रमांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. नागपूर पोलिसांनी आयोजित केलेल्या सायक्लोथोन मध्ये सुमारे साडेतीन हजार लोकांनी सहभाग घेतला.. तर धरमपेठमध्ये एका दैनिकाने आयोजित केलेल्या हॅपी स्ट्रीट कार्यक्रमातही तुफान गर्दी पाहायला मिळाली. मात्र यावेळी उपस्थित असणाऱ्या कुणाच्याही तोंडावर मास्क नव्हता... तसंच सोशल डिस्टन्सिंगचाही उपस्थितांना विसर पडल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे ही गर्दी कोरोनाला निमंत्रण देणारी तर ठरणार नाही ना अशी शंका उपस्थित होतेय..


User: ABP Majha

Views: 22

Uploaded: 2022-06-19

Duration: 00:52

Your Page Title