Maharashtra Political Crisis : बंडखोर आमदारांची खाती काढली, उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे गटाला धक्का

Maharashtra Political Crisis : बंडखोर आमदारांची खाती काढली, उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे गटाला धक्का

Maharashtra Political Crisis : राज्यातील सर्वात मोठ्या सत्तासंघर्षात अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का दिलाय. मुख्यमंत्र्यांनी बंडखोर नेत्यांकडे असलेल्या खात्यांचा पदभार आपल्या गटातील आमदारांकडे सोपवलाय.. शिवसेनेचे ९ मंत्री सध्या शिंदे गटात आहे.. त्यामुळे त्यांच्या खात्यांचं फेरवाटप मुख्यमंत्र्यांनी केलंय. जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहावीत. तसेच पावसाळ्यात अतिवृष्टी  होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पडावीत. या  हेतूने शिंदे गटातील पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा  निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.


User: ABP Majha

Views: 550

Uploaded: 2022-06-27

Duration: 02:36

Your Page Title