७६ वर्षीय आईला प्रशासनानं झुकवलं; मुलाच्या मृत्यूनंतर म्हाताऱ्या आईची परवड..! Pune Old Lady News

७६ वर्षीय आईला प्रशासनानं झुकवलं; मुलाच्या मृत्यूनंतर म्हाताऱ्या आईची परवड..! Pune Old Lady News

या आहेत इंदुबाई शिवाजी फाळके. ७६ वर्षीय या आजी पुण्यात प्रशासकीय कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला बसल्या आहेत. २५ वर्षांपूर्वी इंदुबाई यांचे पती बेपत्ता झाले ते कधी सापडलेच नाहीत... दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार त्यांनी एकटीनं कष्टाची कामं करून जगवला. मुलींची लग्न लावून दिलीत. पती भूमी अभिलेख मध्ये भूकर मापक पदावर कामाला होते. त्यांच्या जागी इंदुबाई यांनी पोराला लावून घेतलं. पण नियतीनं एकुलता एक आधारही या म्हाताऱ्या आईकडून हिसका घेतला... मुलाचं चार वर्षांपूर्वी अपघाती निधन झालं. आता त्यांना कोणी नाही समजून प्रशासकीय अधिकारीही त्यांच्याशी तुच्छपणे वागत आहेत... कामावर असताना मुलगा गेला असल्यानं भूमी अभिलेख खात्यातून मुलाच्या नावे काही रक्कम इंदुबाई यांना मिळणे आहे. म्हाताऱ्या जीवाचा उरला सुरला आधारही आता भुमी अभिलेख विभाग हिसकावू पाहतंय... (Shivani Anchor)br br @पुणे #पुणे #Pune #LokmatNews br br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 90

Uploaded: 2022-08-07

Duration: 09:38