वेळ असेल तर मुख्यमंत्रीसाहेब आमच्याकडेही लक्ष द्या; Adivasi पाड्यातील महिलांची आर्त हाक| Hingoli BJP

वेळ असेल तर मुख्यमंत्रीसाहेब आमच्याकडेही लक्ष द्या; Adivasi पाड्यातील महिलांची आर्त हाक| Hingoli BJP

राज्यभरात राष्ट्रीय महामार्गाचे जाळ पसरत असताना दुसरीकडे मात्र ग्रामीण भागात अद्यापही पूर्णपणे रस्ते न झाल्याचे दिसून येते. त्यामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी शहरापासून व राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या आठ किमी अंतरावर असलेल्या सोनवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जुनूना वस्ती मधील महिलेला प्रसूतीसाठी दुर्दैवी बैलगाडीतून रुग्णालय गाठावा लागलं. तालुक्यातील जुनून वस्ती ही 40 वर्षापासूनची जुनी वस्ती आहे. या वस्तीत 28 घरे असून येथील लोकसंख्या 200 च्या जवळपास आहे.


User: HW News Marathi

Views: 4

Uploaded: 2022-08-10

Duration: 05:18

Your Page Title