BJP MLA Raja Singh Arrested : हैदराबादमध्ये सध्या काय वातावरण आहे? माझाचा ग्राऊंड रिपोर्ट

BJP MLA Raja Singh Arrested : हैदराबादमध्ये सध्या काय वातावरण आहे? माझाचा ग्राऊंड रिपोर्ट

मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त टिपण्णी करणारे तेलंगणामधले भाजप आमदार टी. राजा यांना पोलिसांनी काल पुन्हा अटक केलीय. मंगळवारी त्यांना अटक झाल्यानंतर काही तासांतच त्यांची जामिनावर सुटका झाली होती. या वक्तव्यामुळे त्यांना भाजपमधून निलंबितही करण्यात आलं होतं. त्यानंतर टी राजा यांच्याविरुद्ध दोन पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवल्यानंतर त्यांना पुन्हा अटक करण्यात आलीय. त्यांच्या अटकेनंतर हैदराबादमध्ये आज शुक्रवारच्या नमाजाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवण्यात आलीय. तर एमआयएमचे अध्यक्ष असुदुद्दीन ओवैसी यांनी काल रात्री सर्वांना शांततेचं आवाहन केलंय.


User: ABP Majha

Views: 141

Uploaded: 2022-08-26

Duration: 03:26