“ह्यांना ‘ढाल-तलवार’ नाही ‘कुलूप’ चिन्ह द्या”, Sanjay Raut यांचा शिंदे सरकारवर घणाघात |Eknath Shinde

“ह्यांना ‘ढाल-तलवार’ नाही ‘कुलूप’ चिन्ह द्या”, Sanjay Raut यांचा शिंदे सरकारवर घणाघात |Eknath Shinde

संजय राऊत यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सुरु असलेल्या सीमावादाच्या मुद्द्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केले. गेल्या २४ तासांपासून कर्नाटकात ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड होत आहे, ते सर्व सरकारी प्रेरणेने सुरु आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना घरात घुसून अटक केली जात आहे, त्यांना तुरुंगात डांबले जात आहे. आता आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सीमावादावर तोडगा काढण्यासाठी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणार आहेत. पण त्याची गरजच काय आहे, केंद्रीय गृहमंत्र्यांना काय चाललंय हे कळत नाही का? महाराष्ट्रातील सध्याचे सरकार हे डरपोक आहे, त्यांनी आपल्या सीमांची आणि जनतेची काळजी नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.


User: HW News Marathi

Views: 21

Uploaded: 2022-12-07

Duration: 07:01

Your Page Title