Vikhe Patil on Padalkar:'बाहेरच्यांपेक्षा जिल्ह्यातील लोकांच्या..'; नामांतरावरून विखे पाटलांचा टोला

Vikhe Patil on Padalkar:'बाहेरच्यांपेक्षा जिल्ह्यातील लोकांच्या..'; नामांतरावरून विखे पाटलांचा टोला

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी नगर जिल्ह्याचं नामांतर करण्याची मागणी केली. यावर राज्याचे पशू संवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "बाहेरील कोणी येऊन त्यावर भाष्य करण्यापेक्षा जिल्ह्यातील लोकांच्या भावना महत्त्वाच्या आहेत. नामांतराच्या व विभाजनाच्या मुद्यावरुन मतभिन्नता आणि मतभेद तयार होतात. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासात्मक दृष्टीने सर्वांनी एकत्रित येऊन विचार करण्याची आवश्यकता आहे", असं पाटील म्हणाले. तसंच आपलं या गोष्टीला समर्थन नसल्याची भूमिका त्यांनी मांडली.


User: Lok Satta

Views: 2

Uploaded: 2023-01-03

Duration: 02:54