मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर संजय राऊतांची टीका Sanjay Raut Eknath Shinde

मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर संजय राऊतांची टीका Sanjay Raut Eknath Shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे दावोस दौऱ्यावर गेले आहेत. दावोसमधून राज्यासाठी मोठी गुंतवणूक आणणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली आहे. तुमच्या नाकासमोर राज्यातील प्रकल्प गुजरातने पळवले. त्यामुळे राज्याचं मोठं नुकसान झालं. राज्यातील गुंतवणूक आणि रोजगार गेले आहेत. त्यामुळे दावोसला जाण्याआधी गुजरातला जा, असा टोला संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.


User: HW News Marathi

Views: 11

Uploaded: 2023-01-16

Duration: 07:13

Your Page Title