“मला ‘पाणीवाला बाबा’ व्हायचेय” - Gulabrao Patil | BJP Shivsena | Uddhav Thackeray | Eknath Shinde

“मला ‘पाणीवाला बाबा’ व्हायचेय” - Gulabrao Patil | BJP Shivsena | Uddhav Thackeray | Eknath Shinde

इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनच्या तीन दिवसीय ५५ व्या अखिल भारतीय वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी पुण्यात झाले. हे अधिवेशन पुण्यातील हडपसर येथील मेस्से ग्लोबल सेंटर येथे सुरू झाले आहे. या अधिवेशनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी नेहमीच्या शैलीत भाषण केले. ‘मला लोक प्रेमाने भाऊ म्हणतात. पण मला भाऊ व्हायचे नाही, तर मला ‘पाणीवाला बाबा’ व्हायचे आहे. कारण पाणी पाजणे हे पुण्याचे काम असून, आपल्याला ते करायचे आहे. ‘वर दाढीवाला, इथे मंत्री दाढीवाला आणि सचिवही दाढीवाला’ असे म्हणत केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात मंत्री गुलाबराव पाटील आणि विभागात प्रधान सचिव संजीव जैसवाल असल्याची टिप्पणी गुलाबराव पाटील यांनी केली.


User: HW News Marathi

Views: 2

Uploaded: 2023-01-20

Duration: 03:38

Your Page Title