पहाटेचा शपथविधी; देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यावर Chandrashekhar Bawankule यांची प्रतिक्रिया

पहाटेचा शपथविधी; देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यावर Chandrashekhar Bawankule यांची प्रतिक्रिया

कसबा पेठ आणि चिंचवडच्या पोटनिवणुकीकडे संपुर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. निवडणुकीत आपले उमेदवार उभे करत महाविकास आघाडीने भाजपाला आव्हान दिल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी पहाटेच्या शपथविधीवरून प्रश्न विचारला असता जे झालं तेच देवेंद्र फडणवीस बोलले असतील, असं बावनकुळे म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे राजकारणाकरिता स्वतःची खुर्ची वाचविण्याकरिता किंवा खुर्ची मिळविण्याकरीता ते कधीच असत्य कथन करीत नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.


User: Lok Satta

Views: 0

Uploaded: 2023-02-15

Duration: 02:48