राष्ट्रवादीत Ajit Pawar यांच्यावरवर अन्याय? BJP नेत्याने टाकली ठिणगी | Sharad Pawar | NCP

राष्ट्रवादीत Ajit Pawar यांच्यावरवर अन्याय? BJP नेत्याने टाकली ठिणगी | Sharad Pawar | NCP

विरोधी पक्षनेते अजित पवारांवर अन्याय झाला आहे. राष्ट्रवादीचे (NCP) आमदार २००४ मध्ये सर्वाधिक निवडून आले होते. मात्र, त्यांना मुख्यमंत्रीपदी संधी मिळाली नाही. विरोधक असले तरी अजितदादांचे कर्तृत्व मान्यच केले पाहिजे. प्रशासनावर त्यांचा वचक आहे. राज्याच्या विकासाचे नियोजन आहे. आमचे राजकीय विरोधक आहेत; पण त्यांचे काम आहे, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजितदादांची स्तुती केलीय. तसेच अजित पवार मुख्यमंत्री झाले तर ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा होतील, अशी भीती शरद पवारांना वाटली असेल. पक्षात आणि सरकारमध्येही तेच मुख्य झाले असते, असंही बावनकुळे म्हणाले.


User: HW News Marathi

Views: 1.1K

Uploaded: 2023-02-24

Duration: 03:20