जाहिरातबाजी, खानपानावर कोट्यावधींची उधळण; शेतकऱ्यांचं काय Eknath Shinde Ajit Pawar Farmers

जाहिरातबाजी, खानपानावर कोट्यावधींची उधळण; शेतकऱ्यांचं काय Eknath Shinde Ajit Pawar Farmers

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अडीच कोटी खानपानावर खर्च करण्यात आलया, असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. चहात सोन्याचं पाणी घातलं होतं का?” असा सवालही त्यांनी विचारला. शेतकरी संकटात असताना सरकार मात्र जाहिरातींमध्ये मश्गुल असल्याचा घणाघातही अजितदादांनी केला. याला प्रत्युत्तर देत मुख्यमंत्र्यांनीही म्हंटलं की आम्ही चहापाणी देतो बिर्यानी नाही. पण खानपानावर जर एवढा खर्च होत असेल तर शेतकऱ्याचं काय? एकीकडे 10 पोतं कांदा विकल्यावर शेतकऱ्याला फक्त दोन रुपये मिळतो, काही हजार रुपायांसाठी आज शेतकरी आत्महत्या करतो त्याचं काय? शेतकऱ्याला मदतीचं आश्वासन देऊन मतं मागितली जातात आणि सत्तेत आल्यावर आधी त्यालाच दुर्लक्ष केलं जातं, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.


User: HW News Marathi

Views: 39

Uploaded: 2023-02-27

Duration: 06:50

Your Page Title