Assembly Budget Session : कांद्याला रास्त भाव मिळावा म्हणून विरोधक आक्रमक | Ambadas Danve

Assembly Budget Session : कांद्याला रास्त भाव मिळावा म्हणून विरोधक आक्रमक | Ambadas Danve

विधानसभेचं कामकाज सुरू होताच विरोधकांनी कांदा आणि कापसाच्या दराचा मुद्दा उपस्थित केला. विरोधकांनी कांद्याला रास्त भाव मिळण्याची मागणी करत विधानभवनात अनोखं आंदोलन केलं. यावेळी विरोधी पक्षाचे आमदार डोक्यावर कांद्याच्या पाट्या घेऊन भवनात दाखल झाले. कांद्याला रास्त भाव मिळालाच पाहिजे, अशा घोषणा विरोधकांनी यावेळी दिल्या. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 'सरकार विरोधी पक्षाचा आवाज दाबतंय. कांद्याला योग्य भाव दिला पाहिजे' अशी मागणी केली.


User: Lok Satta

Views: 1

Uploaded: 2023-02-28

Duration: 02:32

Your Page Title