Sanjay Raut on Kasba: 'घराघरात पैशांची पाकीटं फेकण्यात आली तरी...'; निकालावर राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut on Kasba: 'घराघरात पैशांची पाकीटं फेकण्यात आली तरी...'; निकालावर राऊतांची प्रतिक्रिया

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुण्यातील पोटनिवडणुकीच्या निकालावरून भाजपावर टीकास्र सोडलं. “पैसा आणि सत्तेचा गैरवापर होऊनसुद्धा पुण्यातल्या सुजान मतदारांनी सत्ताधाऱ्यांना जी चपराक लगावली आहे. यातून भाजपाने धडा घेतला पाहिजे. या निवडणुकीत पुणेकरांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला, पण पुणेकर त्याला बळी पडले नाहीत. त्यासाठी पुणेकरांचं अभिनंदन केलंच पाहिजे. कसब्यात घराघरात पैशांची पाकीटं फेकण्यात आली. तरी सुद्धा लोकांनी ही धनशक्ती लाथाळली. मुळात ही आता सुरुवात आहे. कसबा तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, असे ते म्हणाले. तसेच महाविकास आघाडी एकत्र लढल्यास २०२४ मध्ये आमच्या २०० जागा निवडणूक येतील”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


User: Lok Satta

Views: 1

Uploaded: 2023-03-04

Duration: 03:22

Your Page Title