Pune: राहुल गांधी यांना शिक्षा आणि पुण्यात काँग्रेसचं भाजपाविरोधात आंदोलन | Rahul Gandhi | Modi

Pune: राहुल गांधी यांना शिक्षा आणि पुण्यात काँग्रेसचं भाजपाविरोधात आंदोलन | Rahul Gandhi | Modi

काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये कर्नाटकच्या कोलार येथे आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून टीका केली होती. 'सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे?' असा प्रश्न त्यांनी विचारला होता. याविरोधात गुजरातमधील भाजपाचे माजी आमदार तथा माजी मंत्री पुर्णेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. त्या प्रकरणी न्यायालयाने राहुल गांधी दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्या निर्णयानंतर देशभरात काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. त्याच दरम्यान पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.


User: Lok Satta

Views: 2

Uploaded: 2023-03-23

Duration: 01:58