घरात एकदाही विजेचा वापर न केलेल्या पुण्यातील डॉ. हेमलता साने | गोष्ट असामान्यांची भाग ४४

घरात एकदाही विजेचा वापर न केलेल्या पुण्यातील डॉ. हेमलता साने | गोष्ट असामान्यांची भाग ४४

पुण्यातील बुधवार पेठ येथे राहणाऱ्या ८३ वर्षांच्या डॅा. हेमलता साने यांनी आपल्या घरात आतापर्यंत एकदाही वीज वापरलेली नाही. डॅा. हेमलता साने वनस्पती विषयाच्या ज्येष्ठ अभ्यासक, संशोधक आणि लेखिका आहेत. पर्यावरण, इतिहास, वनस्पतीशास्त्र अशा अनेक विषयांवरील पुस्तकांच लेखनही त्यांनी केलंय आणि तेही विजेशिवाय. हेमलता साने या स्वतः वनस्पतीतज्ज्ञ असल्याने पर्यावरणाविषयीचं त्यांचं प्रेम त्या लिखानातून मांडतातच. मात्र आपल्या राहणीमानातूनही ते त्या दाखवून देतात. एकंदर पर्यावरण आणि आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन हा इतरांपेक्षा नक्कीच वेगळा आहे.


User: Lok Satta

Views: 1

Uploaded: 2023-06-21

Duration: 11:22

Your Page Title