कुर्ल्यातील हॉटेलला भीषण आग, आगीत पूर्ण हॉटेल जळून खाक; पाहा व्हिडिओ

कुर्ल्यातील हॉटेलला भीषण आग, आगीत पूर्ण हॉटेल जळून खाक; पाहा व्हिडिओ

pमुंबई : कुर्ला येथील एका हॉटेलला शनिवारी (11 जाने.) रात्री आग लागली. या आगीची भीषणता मोठी असल्यानं हे हॉटेल पूर्णपणे जळून खाक झालं. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी तसंच कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती प्रशासनानं दिलीय. पालिकेच्या माहितीनुसार, रात्री 9.05 वाजता एलबीएस मार्गावर असलेल्या रंगून झायका हॉटेलमध्ये आग लागली. या भागात आग लागल्याची माहिती एका स्थानिक व्यक्तीनं अग्निशमन विभागाला कळवली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या आगीची भीषणता इतकी मोठी होती की, या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आज रविवार पहाटे तीन वाजता अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. दरम्यान, या आगीचं कारण अद्याप समोर आलं नसलं तरी, या घटनेची चौकशी केली जात असल्याची माहिती प्रशासनानं दिलीय.


User: ETVBHARAT

Views: 1

Uploaded: 2025-01-12

Duration: 00:30

Your Page Title