५ हजार शहाळ्यांमध्ये ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पा विराजमान; पहा व्हिडिओ

५ हजार शहाळ्यांमध्ये ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पा विराजमान; पहा व्हिडिओ

pपुणे- श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात 'शहाळे महोत्सव' आयोजित करण्यात आलं आहे. वैशाख वणव्यापासून तमाम भारतीयांचे रक्षण व्हावे, दुष्काळ, आरोग्यसंपन्न भारत, शेतकऱ्यांच्या समस्या दूर होण्यासोबत श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पांसमोर प्रार्थना करीत शहाळे महोत्सवात ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य बाप्पाला दाखविण्यात आला आहे. आरास पाहण्यासाठी पहाटेपासून भाविकांनी मोठी गर्दी केली. ससून रुग्णालयातील रुग्णांना शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार आहे, असेही ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.  वैशाख शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गणेश जन्माची पूजा आणि अभिषेक झाला.  तसेच मंदिरामध्ये गणेशयागदेखील करण्यात आला. पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात हा शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. पार्वती मातेला दिलेल्या वरानुसार भगवान श्री गणेशानं विनायक अवतारामध्ये प्रगट होऊन दुर्मती राक्षसाचा वध केला.  त्यामुळे वैशाख शुद्ध पौर्णिमेचा दिवस हा पुष्टिपती विनायक जयंती म्हणून साजरा केला जातो.


User: ETVBHARAT

Views: 4

Uploaded: 2025-05-12

Duration: 01:51

Your Page Title