साईबाबांच्या शिर्डीत अनेकांच्या जीवनात आला 'प्रकाश'; पाहा व्हिडिओ

साईबाबांच्या शिर्डीत अनेकांच्या जीवनात आला 'प्रकाश'; पाहा व्हिडिओ

pशिर्डी : साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी व आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नविन पनवेल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 2 जून रोजी चौदावे मोफत नेत्र तपासणी, चष्मा वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर शिर्डी येथे पार पडले. माणसाच्या आयुष्यात डोळ्यांना फार महत्त्व असते. त्यामुळे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपण अशा शिबिराचे आयोजन करत असून, त्यातून मिळणारे समाधान पैशापेक्षा मोठे असल्याचे मत ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांनी व्यक्त केले. केवळ आर्थिक परिस्थिती नाही म्हणून आज महाराष्ट्रात लाखो लोक डोळ्याच्या आजाराने ग्रस्त असून, खासगी वैद्यकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया करणे परवडत नसल्याने अशा रुग्णांसाठी साईबाबांनी दिलेल्या रुग्णसेवेचा वसा घेऊन आपण अशा प्रकारचे शिबिरांचा उपक्रम सुरू केला . त्यातून हजारो रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली असून, जवळपास बाराशे रुग्णांवर नेत्र शस्त्रक्रिया करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम करू शकलो यातच गायकवाड परिवाराला मोठे समाधान असल्याचे श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड म्हणाले.


User: ETVBHARAT

Views: 8

Uploaded: 2025-06-02

Duration: 04:41

Your Page Title