थेट उदयनराजेंसमोर उडवली कॉलर! कुणी केलं डेअरींग? पाहा व्हिडिओ

थेट उदयनराजेंसमोर उडवली कॉलर! कुणी केलं डेअरींग? पाहा व्हिडिओ

pसातारा MP Udayanraje Bhosale Video : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हटके स्टाईलवर केवळ तरूणच नाही तर तरूणी आणि चिमुकले देखील फिदा होतात. कॉलर उडवण्याची उदयनराजेंची स्टाईल त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते. चाहते सुद्धा त्याचं अनुकरण करत असतात. मात्र, उदयनराजेंसमोर कॉलर (Udayanraje Bhosale Collar Video) उडवत एका चिमुकल्यानं उदयनराजेंनाच 'टशन' दिलं आहे. ओजस चव्हाण असं त्या चिमुकल्याचं नाव आहे. उदयनराजेंचे निकटवर्तीय पंकज चव्हाण यांचा तो मुलगा आहे. घरी आल्यावर त्यानं उदयनराजेंना फूल आणि ड्राय फ्रूट दिलं. त्यानंतर उदयनराजेंसमोर त्यानं दोनदा कॉलर उडवली. मग उदयनरजेंनीही कॉलर उडवून त्या चिमुकल्या दाद दिली.  सध्या या व्हिडिओची सातारा जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर देखील हा व्हिडिओ शेयर केला जात आहे.


User: ETVBHARAT

Views: 146

Uploaded: 2025-06-09

Duration: 01:44

Your Page Title