ग्यानबा तुकाराम', 'माऊली, माऊली'चा गजर....; पाहा श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा ड्रोन व्हिडिओ

ग्यानबा तुकाराम', 'माऊली, माऊली'चा गजर....; पाहा श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा ड्रोन व्हिडिओ

pपुणे : आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये भक्तिमय वातावरण असतं. येत्या 6 जुलै रोजी आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2025) आहे. 'ज्ञानोबा माऊली-तुकाराम' असा नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर... तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका...अशा भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने पंढरपूरकडं प्रस्थान केलं आहे. यावेळी भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. उद्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं पुण्यात आगमन होणार आहे. टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात तल्लीन वारकरी....'ग्यानबा तुकाराम', 'माऊली, माऊली'चा गजर.... डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी...अशा भक्तिमय वातावरणात देहू येथून आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी उपस्थित होते. या पालखी सोहळ्याचा ड्रोन व्हिडीओ पाहा.


User: ETVBHARAT

Views: 11

Uploaded: 2025-06-19

Duration: 02:37