आषाढी वारी : पुण्यनगरीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी दाखल, मोठ्या संख्येने वारकरी पुण्यात

आषाढी वारी : पुण्यनगरीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी दाखल, मोठ्या संख्येने वारकरी पुण्यात

pपुणे : माऊली... माऊलीचा जयघोष... ज्ञानोबा माऊली-तुकाराम' असा नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर... तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका... अशा भक्तिमय वातावरणात जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज भक्तिमय वातावरणात पुण्यनगरीत पालखी दाखल झाला आहे. आज संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर पालखी पुण्यात दाखल झाली. पुण्यातील भवानी पेठ येथे पालखीचा मुक्काम असणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी साडेसात वाजल्याच्या सुमारास पुण्यनगरीत दाखल झाली असून पालखीसोबत मोठ्या संख्येनं वारकरी पुण्यात दाखल झालेत. ठिकठिकाणी वारकऱ्यांचं स्वागत केलं जात आहे. आज आणि उद्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा पुण्यात मुक्काम असणार आहे. मोठ्या प्रमाणावर पुणेकर नागरिक, गणेश मंडळे, तसंच सामाजिक संस्थेच्या वतीनं वारकऱ्यांसाठी सोयी सुविधा तसंच विशेष व्यवस्था करण्यात येत असते.


User: ETVBHARAT

Views: 37

Uploaded: 2025-06-20

Duration: 03:43

Your Page Title