वारकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे; पाहा व्हिडिओ

वारकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे; पाहा व्हिडिओ

pबीड : श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथील संत वामनभाऊ महाराज यांचा पालखी सोहळा 25 जूनला गहिनीनाथ गड येथून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. वनवेवाडी डोंगरात मोठी दरड कोसळली आहे. सर्वच रस्ता वाहून गेला आहे. वनवेवाडी डोंगरात लाखो वारकरी कशी चालणार पंढरीची वाट? असा प्रश्न वारकऱयांना पडला आहे. वारकऱ्यांची पाऊले पंढरीकडे जात असतांना मध्येच थांबून रस्त्यावरील दगड हटवावी लागत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गहिनीनाथ गडाचे भक्त असून, त्यांनी शब्द टाकला की वारकऱ्यांची वारी सुखरूप होईल. वारी सुखरूप करण्यासाठी तत्काळ डोंगरातील रस्ता दोन ते चार दिवसात थोडाफार का होईना दुरूस्ती करावा, आशी माघणी वारकरी करत आहेत. आषाढी वारीसाठी पालख्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी पंढरपूरला मार्गस्थ झाल्या आहेत.


User: ETVBHARAT

Views: 123

Uploaded: 2025-06-21

Duration: 05:12