"तुमच्या मनातलं भारतीय सैन्यानं पूर्ण केलं" 'ऑपरेशन महादेव'नंतर एकनाथ शिंदे यांनी आसावरी जगदाळेंशी साधला संवाद

"तुमच्या मनातलं भारतीय सैन्यानं पूर्ण केलं" 'ऑपरेशन महादेव'नंतर एकनाथ शिंदे यांनी आसावरी जगदाळेंशी साधला संवाद

pपुणे : पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. यात पुण्याचे पर्यटक कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचात मृत्यू झाला होता. या घटनेत संतोष जगदाळे यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगी देखील तिथं होती. या घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. आता भारतीय सैन्यानं राबवलेल्या 'ऑपरेशन महादेव' अंतर्गत पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड मुसा याला मारलं. यानंतर सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी आसावरी जगदाळे यांच्याशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधत अभिनंदन केलं. "तुमच्या सगळ्यांच्या मनात होतं कीआतंकवाद्यांना ठार केलं पाहिजे. ते भारतीय सैन्यानं केलं आहे. भारताचा शत्रू कुठंही जीवंत राहणार नाही. याची काळजी भारतीय सैन्य आणि पंतप्रधान घेत आहेत," असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.


User: ETVBHARAT

Views: 2

Uploaded: 2025-07-28

Duration: 02:49

Your Page Title