"मराठा भीक मागणारे नाही तर इतिहास घडवणारे!"; मराठा बांधवांसाठी गाव खेड्यातून भाकरी-ठेचा मुंबईच्या दिशेनं

"मराठा भीक मागणारे नाही तर इतिहास घडवणारे!"; मराठा बांधवांसाठी गाव खेड्यातून भाकरी-ठेचा मुंबईच्या दिशेनं

pबीड : साक्षाळ पिंपरी येथील गावकऱ्यांनी आझाद मैदानावरील मराठा बांधवांसाठी 5 लाख भाकरी, ठेचा, चटणी आणि लोणचं पाठवलं आहे. आझाद मैदानावरील मराठा बांधवांची जेवणाची गैरसोय आहे. त्यामुळं गावकऱ्यांकडून प्रत्येक गावात हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावरील उपोषणाचा तिसरा दिवस आहे. "सरकारला एकच सांगणं आहे की मराठा समाज भीक मागणारा नाही.  तर इतिहास घडवणारा आहे. आजचा आमचा हा संघर्ष आमच्या लेकरांचं उद्याचं भविष्य घडवणार आहे. त्यामुळं आम्हाला कितीही अडचणी आल्या तरी आम्ही मागं हटणार नाही. आम्ही लाडक्या बहिणी आहोत.  मात्र आमच्या भावांना हे सांगणं आहे की तुमचे दाजी पावसात भिजत आहेत. त्यांची सोय करा आणि आम्हाला आरक्षण द्या, अस म्हणत एका महिलेनं आपली भावना व्यक्त केली.


User: ETVBHARAT

Views: 20

Uploaded: 2025-08-31

Duration: 02:08

Your Page Title