"पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायची काय गरज होती?" असुद्दिदीन ओवैसी यांची पंतप्रधान मोदींवर टीका

"पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायची काय गरज होती?" असुद्दिदीन ओवैसी यांची पंतप्रधान मोदींवर टीका

pपुणे : आशिय कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात  भारतीय संघानं पाकिस्तान संघाचा पराभव केल्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'ऑपरेशन सिंदूर 3.0' असं एक्सवर पोस्ट करत शुभेच्छा दिल्या. यावरून मंगळवारी एमआयएमचे अध्यक्ष, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. "जर आपण पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळलो नसतो तर त्यांना पैसे मिळाले नसते. ऑपरेशन सिंदूरनंतर सगळं बंद करून आपण त्यांच्यासोबत सामना खेळलो. सामन्यात आपल्या संघानं विजय मिळवल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'ऑपरेशन सिन्दुर 3.0' असं म्हणत एक्सवर पोस्ट केली. परंतु, देशासाठी आपलं बलिदान देणाऱ्या भारतीय सैन्याची तुलना क्रिकेट सामन्याशी केली." पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे  एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांचा वार्तालाप आयोजित केला होता. यावेळी त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.


User: ETVBHARAT

Views: 0

Uploaded: 2025-09-30

Duration: 06:39

Your Page Title