राहुल गांधींना गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या केरळ भाजपा प्रवक्त्याला अटक करा, सातारा जिल्हा काँग्रेस आक्रमक

राहुल गांधींना गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या केरळ भाजपा प्रवक्त्याला अटक करा, सातारा जिल्हा काँग्रेस आक्रमक

pसातारा : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजपा प्रवक्त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीमुळं राजकीय वातावरण तापलं आहे. खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना गोळ्या घालण्याची धमकी देणारे वक्तव्य भाजपा प्रवक्ते पिंटू महादेवन (Pintu Mahadevan) यांनी केलं आहे. त्याविरोधात सातारा जिल्हा काँग्रेस आक्रमक झाली आहे. त्याच्या वक्तव्याचा सातारा जिल्हा काँग्रेसने तीव्र निषेध करून त्याच्या अटकेची मागणी करण्यात आली. काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कराड तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार कल्पना ढवळे यांना त्याबाबतचं निवेदन दिलं. यावेळी भाजपविरोधी घोषणा देण्यात आल्या. विरोधी पक्षनेते, खासदार राहुल गांधी यांनी देशात संविधान बचावासाठी चळवळ उभी केलेली चळवळ दडपून टाकण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप ही रणजितसिंह देशमुख यांनी केला.


User: ETVBHARAT

Views: 2

Uploaded: 2025-10-02

Duration: 01:07

Your Page Title