सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात आमदार महेंद्र दळवींचा हल्लाबोल, राष्ट्रवादीकडून पलटवार

सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात आमदार महेंद्र दळवींचा हल्लाबोल, राष्ट्रवादीकडून पलटवार

pरायगड : सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच रोहा इथं शिवसेनेच्या आमदार महेंद्र दळवी यांनी युवा प्रतिष्ठानच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं. या उद्घाटनावेळी आमदार दळवी यांनी खासदार तटकरे आणि त्यांच्या कुटुंबावर जोरदार टीका केली. "कोणावर अन्याय करू नका, ताईचा, भाईचा, साहेबांचा फोन येईल असं चालणार नाही," असं म्हणत त्यांनी रोह्यातील दबावाच्या राजकारणावर निशाणा साधला होता. याला राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सायली दळवी यांनी प्रत्युत्तर दिलं. "राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आहेत. त्यामुळं रोह्याच्या विकासाची चिंता आमदार दळवींनी करण्याची गरज नाही. विकास कामासाठी जास्त निधी कोणी आणला? हे रोहेकरांना ठाऊक आहे. पावसाळा जवळ आला की कोकिळा ओरडते.  तसंच निवडणुका जवळ आल्या की महेंद्र दळवींना रोहा शहर आणि विकास दिसायला लागतो", असा त्यांनी टोला लगावला.


User: ETVBHARAT

Views: 26

Uploaded: 2025-10-10

Duration: 03:52

Your Page Title