मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्री पदाचं स्वप्न; ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची टीका

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्री पदाचं स्वप्न; ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची टीका

pपुणे : बीडमध्ये झालेल्या महाएल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी “विखे आला आणि महाराष्ट्रात विखार पसरवून गेला” अशी टीका केली होती. या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर आज ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही जोरदार पलटवार करत राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली. हाके म्हणाले, “विखे पाटील यांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली आहेत. ‘शेखसिल्ली के हसीन सपने’ पाहत आहेत. नगर जिल्ह्यातील दोन आमदारांचाही पाठिंबा नसताना त्यांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली आहेत. बीड येथे झालेल्या महाएल्गार सभेनंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर जोरदार टीका होत आहे. याबाबत हाके म्हणाले, “काही बोललं की हरिभक्त पारायण आणि आम्ही बोललो की आम्ही जातीयवादी अशी आमच्यावर टीका होते. पण आता जशास तसं उत्तर दिलं जाईल. आम्हाला कुणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही. ” हाके यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावरही निशाणा साधला. “जरांगे यांनी राज्यात अमृत नाही, तर विष पेरलं आहे. त्यांनी जाती-जातीत भांडण लावायचं काम केलं. ओबीसींमध्ये फूट पाडण्याचं कामही केलं. बीड जिल्ह्यात निवडून आलेल्या आमदार-खासदारांनीच ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट घातला. म्हणूनच आम्ही आमच्या आंदोलनाची सुरुवात बीडमधून केली आहे.


User: ETVBHARAT

Views: 3

Uploaded: 2025-10-19

Duration: 01:53

Your Page Title