धर्माबादमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी मतदारांना मंगल कार्यालयात डांबलं; पाहा व्हिडिओ

धर्माबादमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी मतदारांना मंगल कार्यालयात डांबलं; पाहा व्हिडिओ

pनांदेड : राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसह (Nagar Panchayats Voting) विविध जिल्ह्यांतील एकूण 143 सदस्यपदांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राज्यभरात मतदान शांततेत सुरू असतानाच नांंदेडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नांदेडच्या धर्माबाद शहरात मतदानाच्या दिवशी खळबळ उडवणारी ही घटना आहे. सकाळपासून नांदेड येथील धर्माबादमधील इनानी मंगल कार्यालयात (Inani Marriage Hall) मतदारांना डांबून (Voters Locked) ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मतदारांना पैसे देण्याचं आमिष दाखवून सकाळपासून इनानी मंगल कार्यालयात डांबून ठेवल्याचा आरोप राष्ट्रवादीचे (अजित पवार) शिरीष गोरठेकर यांनी केला आहे. परिसरात पोलिसांची गाडी येताच मतदारांची मंगल कार्यालयातून बाहेर येण्यासाठी पळापळ सुरू झाली आहे. या प्रकरणी आता पोलीस चौकशी करत आहेत.


User: ETVBHARAT

Views: 2

Uploaded: 2025-12-20

Duration: 01:53