'अजित पवारच आम्हाला न्याय देतील, लाडक्या बहिणीप्रमाणं आम्हाला मानधन द्यावं', तृतीयपंथी उमेदवाराची मागणी

'अजित पवारच आम्हाला न्याय देतील, लाडक्या बहिणीप्रमाणं आम्हाला मानधन द्यावं', तृतीयपंथी उमेदवाराची मागणी

pसोलापूर : राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. सोलापूरमध्ये महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी राजकीय समीकरण जुळवायला सुरुवात केली आहे. महापालिका निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तिकीट मिळावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात एका तृतीयपंथीनं उमेदवारीसाठी अर्ज भरला आहे. जवळपास एक किलो सोनं परिधान करून आलेल्या अबोली अक्का यांनी उमेदवारीसाठी अर्ज भरला आहे. सोलापूर शहरातील प्रभाग 9 मध्ये रामचंद्र मंजेली उर्फ अबोली अक्का या तृतीयपंथी इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज मागताना तृतीयपंथींच्या प्रश्नांबाबत बोलताना त्यांनी खंत व्यक्त केली. "आजही तृतीयपंथींना समाजात हीन वागणूक दिली जाते. रस्त्यावरून जाताना आम्हाला वाईट नजरेनं पाहिलं जातं. अजित पवारांनी लाडक्या बहिणीसाठी दरमहा मानधन सुरू केलं आहे. तसंच मानधन आम्हा तृतीयपंथीयांना सुरू करावं," अशी मागणी रामचंद्र मंजेली उर्फ अबोली अक्का यांनी केली.


User: ETVBHARAT

Views: 5

Uploaded: 2025-12-23

Duration: 03:14