हिंदूंनी किमान तीन मुलं जन्माला घालावीत; भाजपा नेत्या नवनीत राणा यांचं खळबळजनक वक्तव्य

हिंदूंनी किमान तीन मुलं जन्माला घालावीत; भाजपा नेत्या नवनीत राणा यांचं खळबळजनक वक्तव्य

pअमरावती : अमरावतीच्या भाजपा नेत्या नवनीत राणा यांनी लोकसंख्या विषयावर केलेल्या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एका मौलवीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नवनीत राणा यांनी थेट हिंदू समाजाला उद्देशून किमान तीन मुलं जन्माला घालण्याचं आवाहन केलंय. यावेळी नवनीत राणा म्हणाल्या, "देशात एका विशिष्ट वर्गाकडून लोकसंख्या वाढवून भारताला पाकिस्तानसारखे बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा परिस्थितीत हिंदूंनी एक-दोन मुलांवर थांबू नये, तर किमान तीन मुलं जन्माला घालायला हवीत." त्यांच्या या वक्तव्यानं धार्मिक आणि सामाजिक समतोलाबाबत नव्या चर्चांना तोंड फुटलं आहे. तसंच नवनीत राणा यांच्या या विधानामुळं धर्म, लोकसंख्या नियंत्रण आणि राजकारण या मुद्द्यांवरून राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


User: ETVBHARAT

Views: 0

Uploaded: 2025-12-23

Duration: 01:04