Kasaba Peth Bypoll: भाजपाकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर; म्हणाले...

By : Lok Satta

Published On: 2023-02-04

0 Views

02:09

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्या निवडणुकीसाठी आज भाजपाकडून कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर प्रतिक्रिया देत पक्षाचे आभार मानले आहेत.

Trending Videos - 4 June, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - June 4, 2024